समाजाचे ऋण आपण आनंदाने फेडलेच पाहिजे : हिरामणी वाधवा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. संविधानाप्रमाणे आपल्याला सर्व अधिकार हवे असतील, तर आपली काही कर्तव्ये देखील आहेत. त्या कर्तव्याचे पालन आपल्याला करायलाच हवे. ही कर्तव्ये पूर्ण करताना समाजाने आपल्याला घडविले आहे. त्याकरिताच समाजाचा विचार हा सर्वांत प्रथम करायला हवा. लहान वयात दृष्टी गेलेल्या हिरामणी वाधवा यांनी आपला समाजसेवेचा प्रवास विद्यार्थींनी समोर मांडला.

    ॐ असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय | मृत्योर्मामृतं गमय || अर्थात मानवाचा प्रवास असत्याकडून सत्याकडे ने,अंधाराकडून प्रकाशाकडे ने, मृत्यूकडून अमृतत्वाकडे ने, असा घडला पाहिजे. आज सगळ्यांनीच सामाजिक बांधिलकी ही जपलाच हवी. समाजानेच आपल्याला घडविले आहे त्यामुळे समाजाचे ऋण हे आपण आनंदाने फेडलेच पाहिजे.’’ असे उदगार सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती. मणिबेन एम.पी शाह कला आणि वाणिज्य महिला स्वायत्त महाविद्यालयातील मराठी विभाग आयोजित ‘नवदुर्गा : नवविचार’ ह्या व्याख्यानमालेच्या पाचव्या व्याख्यात्या आजीवन कामगिरी पुरस्कृत हिरामणी वाधवा यांनी काढले.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सर्वांना समान अधिकार आणि कर्तव्ये दिली आहेत. संविधानाप्रमाणे आपल्याला सर्व अधिकार हवे असतील, तर आपली काही कर्तव्ये देखील आहेत. त्या कर्तव्याचे पालन आपल्याला करायलाच हवे. ही कर्तव्ये पूर्ण करताना समाजाने आपल्याला घडविले आहे. त्याकरिताच समाजाचा विचार हा सर्वांत प्रथम करायला हवा. लहान वयात दृष्टी गेलेल्या हिरामणी वाधवा यांनी आपला समाजसेवेचा प्रवास विद्यार्थींनी समोर मांडला.

    ‘डोळे नाहीत म्हणजे मी अधू झाले असे नाही तर माझ्याकडे प्रचंड बौद्धिक इच्छाशक्ती आहे.’ त्यामुळे कोणतेही भ्रष्ट आचरण न करता अनेक कडूगोड अनुभवाना सामोरे जात आज ही तेवढयाच तत्परतेने कार्य करणाऱ्या हिरामणी वाधवा ह्या ‘समाजसेवा आणि विद्यार्थींनी’ ह्या विषयावर विद्यार्थींनीशी सुसंवाद साधित होत्या.

    सदर कार्यक्रमात महाविद्यालय आणि मराठी विभागातर्फे प्रमुख व्याख्यात्यांचे स्वागत प्रा. रेणुका प्रजापती यांनी केले. तर सूत्रसंचालन गोड व लाघवी आवाजात माधवी पवार ह्या विद्यार्थींनीने केले. प्रियंका जोगदंड ह्या विद्यार्थींनीने उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील मान्यवर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होत्या. हा कार्यक्रम गुगल-मीटवर ई-पध्दतीने पार पडला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागातील प्रा.वसंत पानसरे आणि प्रा.रश्मी शेटये-तुपे यांनी अथक परिश्रम घेतले.