‘क्वारंटाइन व्हायचं नसेल तर १० हजार भरा’, गायिकेनं केला धक्कादायक आरोप, Video व्हायरल होताच गायिकेविरोधातच पोलिसात तक्रार!

भावाने सांगितलं की माझी टेस्ट करा आणि मग मी क्वारंटाइन होईल. मात्र, हॉटेल मॅनेजमेंटने काहीही ऐकलं नाही. माझा भाऊ तेथून निघून आला मात्र, त्याचा पासपोर्ट अद्यापही तेथेच आहे. नागरिक घाबरुन पैसे देतात मात्र, ज्यांची परिस्थिती नाहीये त्याचं काय.

    मुंबईत होणारा कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता परदेशातून मुंबईत येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइम होण बंधनकारक केलं आहे. त्यानुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांना मुंबई मनपाने सांगितलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन व्हावं लागतं. मात्र, आता असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात क्वारंटाइन न होण्यासाठी आपल्याकडे १० हजारांची लाच  मागितली असल्याचा दावा करण्यात आला आहे. गायिका आणि गीतकार असल्याचं पियू उदासी ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ????? ?????® (@piyuudasiofficial)

    या व्हिडिओत तिने दावा केला आहे की, माझा भाऊ आफ्रिकेवरुन परत आला असता त्याला विमानतळावर थांबवण्यात आलं. त्याला क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं. त्याची दोन वेळा कोरोना चाचणी केली आणि तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. आफ्रिकेवरुन येताना त्याची कोरोना चाचणी करण्यात आली त्यानंतर दुबईत सुद्धा टेस्ट केली आणि दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र, असे असतानाही सात दिवस जबरदस्ती क्वारंटाइन होण्यास सांगितलं. या सात दिवसांत तुमची टेस्ट होणार नाही केवळ तुम्हाला हॉटेलचं रूम भाडे, खाण्या-पिण्याचं आणि औषधांचं बिल भरावं लागेल असं सांगण्यात आलं. याला माझ्या भावाने विरोध केला. त्यानंतर माझ्या भावाला एका पोलीस कर्मचाऱ्याने बाजूला नेत सांगण्यात आलं की आम्ही तुला हॉटेलमध्ये नेण्यात येईल जर तुम्हाला तेथे क्वारंटाईन व्हायचं नाहीये तर तेथील मॅनेजमेंट तुम्हाला काय करायचं हे सांगेल.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ????? ?????® (@piyuudasiofficial)

     

    पियूने पुढे म्हटलं, पोलीस कर्मचाऱ्याने त्या हॉटेलच्या मॅनेजरसोबत फोनवरुन चर्चा केली आणि तो निघून गेला. हॉटेलच्या मॅनेजरने माझ्या भावाला सांगितलं, जर तुला क्वारंटाइन व्हायचं नाहीये तर १० हजार रुपयांची लाच भरावी लागेल. माझ्या भावाचं पासपोर्ट हॉटेल कर्मचाऱ्यांनी घेतलं. जर तुम्ही १० हजार भरले तर तुम्हाला जाऊ देण्यात येईल असं सांगण्यात आलं. माझ्या भावाने लाच देण्यास विरोध केला.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by ????? ?????® (@piyuudasiofficial)

     

    भावाने सांगितलं की माझी टेस्ट करा आणि मग मी क्वारंटाइन होईल. मात्र, हॉटेल मॅनेजमेंटने काहीही ऐकलं नाही. माझा भाऊ तेथून निघून आला मात्र, त्याचा पासपोर्ट अद्यापही तेथेच आहे. नागरिक घाबरुन पैसे देतात मात्र, ज्यांची परिस्थिती नाहीये त्याचं काय.

    पियू उदासीची घेतली दखल

    पियूच्या व्हिडिओनंतर रात्री पोलीस उपायुक्तांचा आम्हाला फोन आला आणि हॉटेल विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. माझ्या भावाच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे तर माझ्या विरोधातही अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. याचं कारण म्हणजे मी व्हिडिओ बनवत त्यांच्यावर आरोप केले.