arman kohli

अरमान कोहलीला(14 Days Judicial Custody To Arman Kohli) १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या न्यायालयाने(Court Decision) अरमान कोहलीला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

    मुंबई : ड्रग्ज प्रकरणात(Drug Case) अटक करण्यात आलेल्या अरमान कोहलीला(14 Days Judicial Custody To Armaan Kohli) १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईच्या न्यायालयाने(Court Decision) अरमान कोहलीला बुधवारी न्यायालयीन कोठडी सुनावली. अरमानच्या घरावर २९ ऑगस्टला एनसीबीकडून छापा टाकण्यात आला होता.अरमानच्या घरातून काही प्रमाणात ड्रग्ज सापडले होते. यानंतर त्याला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले आणि नंतर त्याला अटक करण्यात आली.

    अरमान व्यतिरिक्त ड्रग पेडलर अजय सिंहलाही अटक करण्यात आली.अहवालांनुसार कोहली आणि सिंह व्यतिरिक्त एनसीबीने ड्रग्स प्रकरणात आणखी चौघांना अटक केली आहे, ज्यात २ नायजेरियन नागरिक होते. सध्या एनसीबी बाकीच्यांचीही चौकशी करत आहे.

    एनसीबीने अरमानच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडे ‘अमेरिकन कोकेन’ सापडलं आहे.कोकेन अरमानकडे आलं कसं याबद्दल आता तपास सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एनसीबीने ड्रग्स तस्करीविरोधात मोठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईमध्ये १५ पेक्षा अधिक ड्रग्स पेडलर्सना अटक केली आहे. ड्रग्स तस्करांच्या चौकशीदरम्यान ड्रग्स तस्करीमध्ये अभिनेता अरमान कोहलीचा समावेश असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानंतर एनसीबीने त्याच्या घरावर छापा टाकला.