अभिनेता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी ३ विशेष टीम तयार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी ३ विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. या आत्महत्येप्रकरणी २ बॉलिवूड स्टार आणि ३ प्रॉडक्शन प्रमुखांची चौकशी केली जाणार असल्याची

मुंबई – अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी ३ विशेष टीम तयार करण्यात आल्या आहेत. या आत्महत्येप्रकरणी २ बॉलिवूड स्टार आणि ३ प्रॉडक्शन प्रमुखांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बॅक स्टेजवर असणाऱ्या कलाकारांची सुद्धा चौकशी होणार असल्याची शक्यता आहे.

बॉलिवूड सिंगर सोनू निगम याने सुद्दा एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की, सुशांतप्रमाणेच अनेक नवे गायकही आत्महत्या करू शकतात. त्यामुळे त्याने काही म्युझिक कंपन्यांवर देखील आरोप केले आहेत.

दरम्यान, काल गुरूवारी पाटणामध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अस्थीचं विसर्जन गंगा नदीत करण्यात आलं. यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबियांसमवेत अखेरचा निरोप देण्यात आला होता. आता सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हीच्या चौकशी नंतर २ बॉलिवूड स्टार आणि ३ प्रॉडक्शन प्रमुखांची पोलिस चौकशी करणार असल्याचं सांगितलं जात आहे.