Teen heart throb prathamesh parab starrer darling to be a new year gift to marathi film lovers in january 2021

स्ट्रीम्स ७ डिजिटल थिएटरवर पहिल्या आठवड्यात ५० हजार तर दुसऱ्या आठवड्यात जवळपास १ लाख लोकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्याची माहिती सतीशनं दिली आहे.

    स्ट्रीम्स ७ डिजिटल थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला ‘३५% काठावर पास’ हा चित्रपट कोरोनामुळे आजारी असलेल्या रुग्णांचंही मनोरंजन करण्यात यशस्वी ठरत आहे. सोलापूरमधील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना ‘३५% काठावर पास’ या चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटला. याखेरीज विविध स्तरांवरील प्रेक्षकांकडूनही चित्रपटाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असल्याची भावना दिग्दर्शक सतीश मोतलिंगने व्यक्त केली आहे

    स्ट्रीम्स ७ डिजिटल थिएटरवर पहिल्या आठवड्यात ५० हजार तर दुसऱ्या आठवड्यात जवळपास १ लाख लोकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी सबस्क्राईब केल्याची माहिती सतीशनं दिली आहे. या चित्रपटाला काठावर नव्हे तर प्रेक्षकांनी प्रेम देऊन उत्तीर्ण केल्याची भावना टीमच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे. या चित्रपटात आपल्याला पूर्वीचा प्रथमेश दिसल्याचं काहींचं म्हणणं आहे.

    सतीश मोतलिंग फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात प्रथमेशच्या जोडीला आयली घिया, भाग्यश्री शंखपाळ, यशोमन आपटे, संजय नार्वेकर, नेहा पेंडसे, सुशांत शेलार, विजय पाटकर, उषा नाडकर्णी, भारत गणेशपुरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.