दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेता अनिल नेदुमानगड यांचे शुक्रवारी निधन झाले. ४८ वर्षीय अनिल केरळमधील मालंकारा धरणात बुडाला. आगामी ‘पीस इन थोडपुझा’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हा अपघात झाला. या चित्रपटातील काही कलाकार आणि क्रू मेंबरसह अनिल शुटींगच्या ब्रेकमध्ये वेळ काढून धरणावर आंघोळ करायला गेला आणि दुर्दैवी घटना घडली.

View this post on Instagram
कम्माटी पाडम, नंजन स्टीव्ह लोपेझ या चित्रपटांनी अनिल ओळख मिळवून दिली होती. अनिलचा फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपटात पापम चेय्यथावर हा चित्रपट शेवटचा ठरला.
धरणात बाकीचे सर्वजण आंघोळ करीत असताना, अनिल खोल पाण्यात गेले जेथे त्या लाटांमध्ये अडकल्यामुळे ते बाहेर येऊ शकले नाहीत. जेव्हा त्याच्या मित्रांना तो हरवलेला आढळला, तेव्हा त्यांचा शोध सुरू झाला. अनिल यांना लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. मात्र, जवळच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.