मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी उघडले गेले ८० हजार फेक अकाऊंटस्, ‘या’ देशांमधूनही झाला सोशल मीडियाचा वापर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना (Mumbai police) आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर (Social Media)  तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् (Fake accounts)  सुरू करण्यात आली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना (Mumbai police) आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर (Social Media)  तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् (Fake accounts)  सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला असून, त्यात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच फक्त भारतातूनच नाही, तर इटली, जपान, पोलंड, स्लोव्हेनिया, इंडोनेशिया, तुर्की, थायलंड, रोमानिया आणि फ्रान्स आदी देशातूनही या पोस्ट करण्यात आल्या आहेत.

आम्ही परदेशी भाषांमध्ये असलेल्या या पोस्ट आम्हाला ओळखता आल्या, कारण या पोस्टमध्ये हॅशटॅग वापरण्यात आलेले होते. जसे की #Justiceforsushant #sushantsinghrajput #SSR आणखी काही खात्यांची पडताळणी करण्याचं काम आम्ही करत आहोत, असं एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं की, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतुने ही मोहीम चालवली गेली. त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं सुशांत प्रकरणाच्या तपासावरून लक्ष हटवण्याचाही प्रयत्न यातून करण्यात आला. मुंबई पोलिसांची अश्लाघ्य भाषेत बदनामी करणारे असंख्य फेक अकाऊंटस् उघडण्यात आली. सायबर सेल या संपूर्ण प्रकरणाची तपास करत आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.