रिकाम्या वेळी संगीतकार ए. आर.रेहमान ऐकतो या मराठी गायिकेचं गाणं, स्वत:च केला खुलासा!

संगीताचे साक्षात दैवतच आज मंचावर अवतरले आहे, हे आमच्यासाठी वरदानच आहे. आणि इतक्या मोठ्या मंचावरून ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. या कौतुकामुळे मी भारावले आहे.

    टेलिव्हिजनच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय संगीत रियालिटी शो, इंडियन आयडॉल १२ मधील आगामी महा म्युझिकल वीकएंड प्रेक्षकांची संध्याकाळ नाट्य, मनोरंजन आणि संगीताने भरून टाकण्यास सिद्ध आहे. महान संगीतकार आणि ऑस्कर विजेता ए आर रहमान या भागाची शोभा वाढवणार आहे. स्पर्धकांच्या सुमधुर गीतांचा आस्वाद घेत घेत रहमान काही रोचक किस्से देखील सांगेल. दुसरीकडे, ऋत्विक धनजानी पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसेल आणि परीक्षक आणि स्पर्धकांना बोलते करून कार्यक्रमाची रंगत वाढवेल.

    कार्यक्रमात गप्पांच्या ओघात ऋत्विकने ए आर रहमान यांना विचारले की, मोकळा वेळ असताना त्यांना कोणत्या प्रकारची गाणी ऐकायला आवडते? त्यावर रहमानने उत्तर दिले, “मी जेव्हा दामलेला असतो किंवा माझ्याकडे निवांत वेळ असतो, तेव्हा मी अंजली आणि तिची बहीण नंदिनी यांची शास्त्रीय गीते ऐकतो. मी त्यांना यूट्यूबवर ऐकले आहे आणि अंजलीने तर माझ्या सचिन: ए बिलियन ड्रीम्स या चित्रपटात आवाज देखील दिला आहे.”

    तो पुढे म्हणतो, “मी त्या दोघींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.” त्याबद्दल युवा गायिका अंजली म्हणाली, “सचिन: ए बिलियन ड्रीम्स या चित्रपटासाठी ए आर अमीन (ए आर रहमान यांचा मुलगा) सोबत ‘मर्द मराठा’ सारखे गाणे म्हणायची संधी मला मिळाली हा मी माझा गौरव मानते.

    संगीताचे साक्षात दैवतच आज मंचावर अवतरले आहे, हे आमच्यासाठी वरदानच आहे. आणि इतक्या मोठ्या मंचावरून ते आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. या कौतुकामुळे मी भारावले आहे आणि गाण्याच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी आणखी प्रयत्न करून अशा आणखी संधी मिळवण्यासाठी मला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले आहे.”