स्वातंत्र्यदिनानिमित्त सुशांतला बहिणीकडून अनोखी श्रद्धांजली

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला काल दोन महिने पूर्ण झाले. चाहते अजून देखील या कलाकाराला विविध माध्यमातून श्रद्धांजली देताना आपल्याला दिसत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला काल दोन महिने पूर्ण झाले. चाहते अजून देखील या कलाकाराला विविध माध्यमातून श्रद्धांजली देताना आपल्याला दिसत आहे. अशातच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने स्वातंत्रदिनाचे  औचित्य साधून एकत्र येण्याचे आणि सामुहिक स्वरुपात दिवंगत अभिनेत्यासाठी प्रार्थना  करण्याचे आवाहन केले होते. 

या कँपेनिंगला सुशांतच्या बहिणीसह लाखो चाहत्यांनी तसेच अनेक सिने कलाकारांनी पाठिंबा दर्शविला. लाखो चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. सकाळी १० वाजल्यापासून अनेकांनी सुशांतच्या आत्म्याच्या शांतीसाठी हात जोडून फोटो पोस्ट केले आहेत. हे कँपेनिंग ट्विटर वर #GlobalPrayersForSSR ट्रेंड करत आहे. यामध्ये खालील कलाकारांनी देखील आपला सहभाग दर्शविला आहे. तसेच अनेक जण आज दिवसभरात सहभाग दर्शवतील. 

सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर मुख्य आरोप असणारी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या रियाने सर्वोच्च न्यायालयात याचाच विरोध केला आहे. दरम्यान अभिनेत्याच्या बहिणीने या प्रकरणात #CBIforSSR ची मागणी करत शनिवारी ग्लोबल प्रेयरचे आयोजन केले आहे. अनेकांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.