‘आब्रा-का-डाब्रा’ ची जादू निर्माता, दिग्दर्शकांवर पडणार भुरळ, काय आहे नेमकं जाणून घ्या!

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर माजलाय, त्यात सिनेमा, टिव्हीसिरियल्स, वेबमालिका सगळ्याचं काम थांबलंय. इंडस्ट्रीने खूप उत्तम कलावंत, टेक्निशियन, कामगार या कोरोनामध्ये गमावले. याचे दुःख निश्चितच आहे. मात्र एका बाजूला आशा आहे, की ही परिस्थिती आता हळूहळू निवळेल.

    एखादा चित्रपट पाहावा की नाही, याचा अंदाज प्रेक्षक कसा बांधतात? साहजिकच चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यांचा अनुभव बघून. या गोष्टींमध्ये जितके तथ्य आहे तितकीच आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या चित्रपटाचे पोस्टर, त्याचा प्रोमो, ट्रेलर, हल्ली प्रचलित असलेले प्रमोशनचे माध्यम म्हणजे सोशल मीडिया. चित्रपटाच्या यशात यांचीही मोलाची कामगिरी असते. या सगळ्या गोष्टींवरूनच आपल्याला चित्रपट कसा असेल याची कल्पना येते आणि याचे श्रेय जाते ते पब्लिसिटी डिझायनर आणि ट्रेलर एडिटरला. या सगळ्याचे गणित जुळवताना दिग्दर्शक, निर्माता यांची चांगलीच धावपळ होते.

    हीच पायपीट थांबवून एकाच ठिकाणी ट्रेलर्स-प्रोमोज्, पोस्टर डिझाईन, सोशल मीडिया या सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळाल्या तर? याच गोष्टीचा विचार करून ट्वेंटिफोरएटिवन पब्लिसिटी प्रा. लि. च्या माध्यमातून बॉलिवूड आणि एम टाऊनच्या चित्रपटांची पोस्टरच्या माध्यमातून पहिली झलक दाखवणारे पब्लिसिटी डिझायनर सचिन गुरव आणि प्रिफेस स्टुडिओच्या माध्यमातून हिंदी, मराठी चित्रपटांच्या संकलनाचे काम पाहणारे फैसल महाडीक यांनी एकत्र येऊन ‘आब्रा-का-डाब्रा’ नावाची कंपनी सुरु केली आहे.

    संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर माजलाय, त्यात सिनेमा, टिव्हीसिरियल्स, वेबमालिका सगळ्याचं काम थांबलंय. इंडस्ट्रीने खूप उत्तम कलावंत, टेक्निशियन, कामगार या कोरोनामध्ये गमावले. याचे दुःख निश्चितच आहे. मात्र एका बाजूला आशा आहे, की ही परिस्थिती आता हळूहळू निवळेल. काम सुरु होईल. आणि इंडस्ट्री पूर्ववत होईल आणि अशा वेळी दिग्दर्शकांना, निर्मात्यांना, तसेच नव निर्मात्यांना ‘आब्रा-का-डाब्रा’चा नक्कीच फायदा होईल. हाच विचार करून फैसल आणि सचिन यांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला.

    संकलनामध्ये १८-१९ वर्षांचा दांडगा अनुभव असणारे फैसल महाडीक आणि जवळपास १५० सिनेमाच्या वर पब्लिसिटी पोस्टर केलेलं डिझायनर सचिन गुरव सांगतात, “आब्रा-का-डाब्रा म्हणजेच मॅजिक! आज सोशल मीडियाच्या, ओटीटीच्या काळात एका क्लिक वर सिनेमाचा फर्स्ट लूक टीजर-ट्रेलर आणि पोस्टर जगाच्या कानाकोपऱ्यात बसलेल्या प्रेक्षकांना दिसतो, त्याच लूकवर ते या सिनेमाची दखल घेतात. सध्याचा कोरोना काळ बघता निर्मात्यांना, दिग्दर्शकांना आमच्या कंपनीद्वारे ट्रेलर्स-प्रोमोज्, (Visual Promotion) पोस्टर डिझाईन, सोशल मीडिया या तीनही महत्वाच्या विभागांचं काम एकत्र एका छत्राखाली मिळावं हाच आमचा उद्देश!