यावेळचे रक्षाबंधन माझ्यासाठी खास, अभिनेत्याने सांगितली खास गोष्टी!

'गुम हैं कीसी के प्यार मैं' या हिंदी मालिकेच्या सेटवर देखील तो धम्माल करणार आहे.

    मराठमोळा अभिनेता आदिश वैद्य साठी यंदाची राखी पौर्णिमा खास असणार आहे. याचे कारण म्हणजे, गतवर्षी लॉकडाऊनमुळे त्याला कुटुंबियांसोबत रक्षाबंधन साजरा करता आला नव्हता. त्यामुळे गेल्यावर्षीची कसर यंदा तो भरून काढणार आहे. इतकेच नव्हे तर, ‘गुम हैं कीसी के प्यार मैं’ या हिंदी मालिकेच्या सेटवर देखील तो धम्माल करणार आहे. हिंदीच्या छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या या मालिकेत तो ‘मोहीत’ ची भूमिका साकारत असून, तो साकारत असलेला प्रामाणिक आणि प्रेमळ भावाचे पात्र लोकांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे.
    याबद्दल आदिश बोलतो, “मला भरपूर बहीणी आहेत, काही मुंबईत तर काही पुण्यात राहतात, यंदा कोरोना काहीप्रमाणात आटोक्यात आल्यामुळे आम्ही एकत्र जमणार आहोत, शिवाय डबल धमाका म्हणजे, “गुम है.. ” च्या सेटवर देखील सण साजरा होईल, माझं शुट असणार आहे. तिथे माझ्या दोन खास मानलेल्या बहीणी आहेत. एक म्हणजे शीतल मौलिक जी माझी ऑनस्क्रीन आई आहे तर दुसरी सर्वांची लाडकी सई वहिनी म्हणजेच आएशा सिंह.”