‘या’ चार कारणांमुळे मी ठरले सर्वाधिक आकर्षक महिला, अभिनेत्री केला खुलासा!

“महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिला ठरणं हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो.”

  आश्रम या वेब सीरिजमधून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री अदिती पोहनकर सध्याची घडीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अलिकडेच तिला महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिलेचा किताब मिळाला. ती २०२०-२१ मधील राज्यातील सर्वात आकर्षक महिला ठरली आहे. चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अन् तिनं देखील एका लाईव्ह चॅटद्वारे आपल्या सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by SHE (@aaditipohankar)

  परंतु अदितीकडे असे कुठले गुण आहेत ज्यामुळं ती इतर सुंदर अभिनेत्रींना मागे सोडत सर्वात आकर्षक महिला ठरली? असा प्रश्न तिला वारंवार विचारला जात आहे. या प्रश्नाचं उत्तर आदितीने एका मुलाखतीत दिलं आहे. एका मुलाखतीत अदितीनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं स्वत:चे हे अनोखे गुण चाहत्यांना सांगितले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by SHE (@aaditipohankar)

  वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, स्पष्टवक्तेपणा आणि विनम्रता या चार गुणांमुळं तिला हे यश मिळतंय असं ती म्हणाली पुढे ती म्हणाली, “महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक महिला ठरणं हा माझ्यासाठी सुखद धक्का होता. मी महाराष्ट्रीयन मुलगी आहे आणि त्याचा मला अभिमान वाटतो.”

   

  View this post on Instagram

   

  A post shared by SHE (@aaditipohankar)

  अदितीचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती. प्रायोगिक नाटकं करत तिनं आपल्या करिअरची सुरुवात केली. अन् आज ती मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील दमदार भूमिका साकारताना दिसते. तिनं आतापर्यंत लव्ह सेक्स और धोका, लय भारी, जेमेनी गणेशम सुरुली राजानम यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शी आणि आश्रम या दोन नव्या वेब सीरिजमुळं ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by SHE (@aaditipohankar)