‘ककुड़ा’ची अधिकृत घोषणा, चित्रपटाच्या निमित्ताने मराठमोळा दिग्दर्शक आदित्यची बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

चित्रपटाबाबत आदित्य म्हणाला की, मी रॅानी स्क्रूवाला यांच्यासोबतच्या या सहयोगासाठी अतिशय उत्साहित आहे.

    ‘ककुडा’ असं काहीसं विचार करायला लावणारं शीर्षक असलेल्या दिग्दर्शक आदित्य सरपोतदारच्या आगामी हिंदी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख आणि साकीब सलीम एकत्र दिसणार असल्याची बातमी ‘नवराष्ट्र’नं काही दिवसांपूर्वीच दिली होती. आता आरएसवीपीनं आपल्या होमग्रोन हॉरर-कॉमेडी ‘ककुड़ा’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली असून, रितेश, सोनाक्षी आणि साकिबसोबत शूटिंग सुरू केल्याचंही सांगितलं आहे.

    ‘ककुड़ा’मध्ये कॉमेडी आणि स्पूक यांचं मिश्रण असून, एका गावाला मिळालेल्या विचित्र अभिशापाची ही कहाणी आहे. या इलेक्ट्रिफाइन्ग तिकड़ीचा सामना एका अशा भूतासोबत होतो, ज्याबरोबरच्या धम्माल रोलरकोस्टर प्रवासात अंधविश्वास, परंपरा आणि प्रेमावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहतं. चित्रपटाबाबत आदित्य म्हणाला की, मी रॅानी स्क्रूवाला यांच्यासोबतच्या या सहयोगासाठी अतिशय उत्साहित आहे.

    हा चित्रपट इतर व्यावसायिक चित्रपटांच्या तुलनेत कणभरदेखील कमी नाही. कास्टिंग अतिशय चोख आहे आणि कथानक तुम्हाला तुमच्या खुर्चीला खिळवून ठेवेल आणि विचारप्रवृत्त करेल. याचं लेखन अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी केलं आहे. या डायरेक्ट-टू-डिजिटल चित्रपटाचं शूटिंग गुजरातच्या विविध भागात सुरू झालं असून, पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.