सुनील शेट्टी पुत्र अहान शेट्टीच्या करियरची गाडी रूळावर, प्रदर्शनाआधीच चित्रपटाच्या अनेक ऑफर्स खात्यात!

सुपर डुपर हिट 'आशिकी'चा तिसरा भाग असलेल्या या चित्रपटाचं शूट पुढल्या वर्षी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    आता खऱ्या अर्थानं रुळावर येत असल्याचं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. साजिद नाडीयादवालांच्या ‘तडप’ या आगामी हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दाखल होणाऱ्या अहानकडे डेब्यू होण्यापूर्वीच बरेच चित्रपट येऊ लागले आहेत. नाडीयादवालांच्या आणखी एका आगामी चित्रपटात तो अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. अहाननं नुकताच ‘तडप’ पूर्ण केला असून, आता केवळ चित्रपटगृहांचे दरवाजे उघडण्याची प्रतीक्षा आहे.

    त्यानंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात येईल. एकीकडं अहानसोबतच सुनील शेट्टीच्या चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकाराच्या पुत्राच्या पदार्पणाच्या चित्रपटाची प्रतीक्षा आहे, तर दुसरीकडं महेश भट्ट यांच्या ‘आशिकी ३’मध्येही त्याची वर्णी लागल्याची बातमी आली आहे. सुपर डुपर हिट ‘आशिकी’चा तिसरा भाग असलेल्या या चित्रपटाचं शूट पुढल्या वर्षी सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

    पदार्पणात धडाकेबाज अॅक्शन करणारा अहान यात इमोशनल भूमिकेत दिसणार असल्याचं समजतं. ‘आशिकी’ सिरीजमधील पहिला आणि दुसरा भाग म्युझिकल सुपरहिट ठरल्यानं तिसऱ्या भागाकडूनही त्याच प्रकारच्या अपेक्षा असणार यात शंका नाही.