‘अन्याच्या लग्नाला यायचं हा…’ संजना आणि अनिरुद्धच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!

ही मालिकेतील पत्रिका नसून एका मीम्स तयार करणाऱ्या पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ही पत्रिका शेअर करत त्यांनी ‘आन्या ऑल द बेस्ट’ असे म्हटले आहे.

    ‘आई कुठे काय करते.’ या मालिकेतील प्रत्येक पात्र हे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या जवळपास २६ वर्षांनंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आता अनिरुद्ध लवकरच संजनाशी लग्न करणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर संजना आणि अनिरुद्धच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे.

    ही मालिकेतील पत्रिका नसून एका मीम्स तयार करणाऱ्या पेजने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. ही पत्रिका शेअर करत त्यांनी ‘आन्या ऑल द बेस्ट’ असे म्हटले आहे.

    काय आहे पत्रिकेत

    चि. अनिरूद्ध यांचा विवाह चि.सौ.का संजनासोबत ठरला आहे. हा विवाहसोहळा आई कांचन यांची प्रकृती स्थिर असेल तेव्हा योजन्यात आला आहे. हा विवाह सोहळा संजना ठरवेल तिथे पार पडणार आहे. विवाह मुहूर्त संजनाचा पहिला पती शेखर येण्याच्या आधी असे पत्रिकेत लिहिले आहे. पुढे या पत्रिकेमध्ये आमच्या पप्पाच्या लग्नाला यायचं हं असे लिहित अनिरुद्ध आणि अरुंधतीची मुले ईशा, यश, अभिषेक यांची नावे लिहिण्यात आली आहेत.