arundhati and sanjana in aai kuthe kay karte

‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या कथानकाने नवे वळण घेतलं आहे. संजनाने अनिरुद्धशी लग्न(Marriage Of sanjana And Aniruddha) करून देशमुखांच्या राहायला सुरुवात केली आहे. यानंतर आता देशमुखांच्या घरातील सगळा कारभार आपल्या हातात घेण्यासाठी संजना प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्यात तिच्या नोकरीकडे तिचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आता तिची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

    ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही स्टार प्रवाहवरील(Star Pravah) मालिका सध्या प्रेक्षकांची अतिशय लाडकी मालिका आहे. या मालिकेत आता संजनाच्या लहान मुलाला अर्थात निखिलला पडलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं शोधताना संजना आणि घरातल्या इतर मंडळींची खूप दमछाक होत आहे. अशातच संजनाची नोकरी(Sanjana To Loose Her Job) जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

    ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या कथानकाने नवे वळण घेतलं आहे. संजनाने अनिरुद्धशी लग्न करून देशमुखांच्या राहायला सुरुवात केली आहे. यानंतर आता देशमुखांच्या घरातील सगळा कारभार आपल्या हातात घेण्यासाठी संजना प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्यात तिच्या नोकरीकडे तिचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आता तिची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

    संजनाची नोकरी जाण्याची चिन्हे असताना यशच्या एका मित्राच्या शॉर्ट फिल्मसाठी अरुंधतीला गाणं गाण्याची संधी मिळणार आहे. या गाण्यामुळे अरुंधतीच्या हातात तिचा पहिला पगार येणार आहे. या गाण्यातून मिळालेले मानधन अर्थात पहिला पगार अरुंधती अप्पा आणि आईच्या हातात देणार आहे. गाण्याच्या संधी व्यतिरिक्त अरुंधतीला एक नवी नोकरी देखील मिळाली आहे.

    अरुंधतीचा पहिला पगार आणि त्याच्या सेलिब्रेशनचा माहोल असतानाच, आता संजनाची नोकरी मात्र गेल्यात जमा होणार आहे. घरात पार्टीची चर्चा सुरु असतानाच संजना कामावरून घरी परतते. इतक्यात अनिरुद्ध तिला तुझं प्रेझेन्टेशन नक्कीच चांगलं झालं असणार असं म्हणतो. तेव्हा चेहरा पाडून संजना त्याला आपली नोकरी धोक्यात असल्याचे सांगते. माझ्या लॅपटॉपमधून प्रेझेन्टेशन डिलीट झाल्याने मेहताने मला देखील दोन महिने घरी बसण्यास सांगितले आहे, असे संजना म्हणते. तर, सकाळी निखिल अभ्यास करत असताना तूच माझ्या लॅपटॉपमध्ये काहीतरी केलं होतंस, अर्थात अरुंधतीनेच ते प्रेझेन्टेशन डिलीट केल्याचा आरोप संजना करणार आहे.