‘आई कुठे काय करते’ मालिकेत होणार नव्या पात्राची एण्ट्री, अनिरूद्ध- आरूंधतीच्या आयुष्यात होणार बदल?

 ‘समृद्धी’ बंगल्यात गौरी-यशच्या साखरपुड्याची जय्यत सुरू झाली आहे. आप्पा देशमुख यांचा दुसरा मुलगा आणि अनिरूद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एण्ट्री होणार आहे.

    स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते?’मध्ये दररोज काही ना काही नवे घडत आहे. आपण जाण्याअगोदर यश आणि गौरीचा साखरपुडा व्हावा ही अरूंधतीची मनापासूनची इच्छा. अरूंधतीचा देशमुख कुटुंबातील हा शेवटचा सोहळा. आता या सोहळ्यात एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Star Pravah (@star_pravah)

    ‘समृद्धी’ बंगल्यात गौरी-यशच्या साखरपुड्याची जय्यत सुरू झाली आहे. आप्पा देशमुख यांचा दुसरा मुलगा आणि अनिरूद्धचा लहान भाऊ अविनाशची या मालिकेत एण्ट्री होणार आहे. आतापर्यंत अनिरुद्ध देशमुख हे पात्र मालिकेत दाखवण्यात आलं नाही. पहिल्यांदाच अविनाश देशमुख प्रेक्षकांना भेटणार आहे. अभिनेता शंतनु मोघे अविनाश देशमुखचं पात्र साकारणार आहे.

    काय घडलं नेमकं

    अविनाश आणि अनिरूद्ध पंजा लावताना दिसत आहेत. अनिरूद्ध अविनाशला म्हणतो की,’मी जिंकलो तर काय देशील?’ त्यावर अविनाश म्हणतो,’तू मागशील ते.. आणि हरलास तर जे मी मागेन ते देखील?’ त्यावर अनिरूद्ध म्हणतो,’ते बघू नंतर…’ या दोघांमध्ये पंजा लावण्यात येतो. अविनाश अनिरूद्धला हरवतो… ठरल्याप्रमाणे जो जिंकेल तो काही तरी मागेल त्याप्रमाणे अविनाश अनिरुद्धला म्हणतो, ‘काय हवं ते माग?’ यानंतर अविनाश हात जोडून,’दादा या घरच्या लक्ष्मीला थांबवं.’ अविनाश आणि अनिरूद्ध यांच्या या संवादानंतर सगळेच स्तब्ध होतात.