aai kuthe ky krte

द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाहीय. पण अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे.

  स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतलाय. अनिरूद्ध आप्पांकडे त्याने तसं बोलूनही दाखवलं आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाहीय. पण अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. अनिरुद्धच्या या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

  एकीकडे अनिरुद्धचं हे असं वागणं, तर दुसरीकडे अभिषेक आणि अंकिताच्या नात्यातही कडवटपणा पाहायला मिळतोय. अभिषेकने लग्न करावं म्हणून अंकिताने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अंकिताने खरंच आत्महत्येचा निर्णय घेतला होता की नाटक रचलं होतं याचा तपास आता अभिषेक करणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Star Pravah (@star_pravah)

   

  अंकिताचा खोटारडेपणा उघड झालाच तर तिला घरातून बाहेर निघण्याची सक्त ताकीदही त्याने दिलीय. त्यामुळे ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे भाग दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होत आहेत. मालिकेतलं हे नवं वळण अनुभवण्यासाठी न चुकता पाहा आई कुठे काय करते.