म्हणून ऐश्वर्याने माझ्याशी लग्न केलं, लग्नाच्या १४ वर्षानंतर अभिषेक बच्चनने केला खुलासा!

अभिषेकने ऐश्वर्याला २००७मध्ये न्युयॉर्क मधील एका हॉटेलच्या बालकनीमध्ये प्रपोज केले होते. साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले.

  अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडमधलं लोकप्रिय कपलपैकी एक. उमराव जान या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी हे रिलेशनशिपमध्ये आले आणि २००७ मध्ये या दोघांनी लग्न केले. आता अभिषेकने एका मुलाखतीत त्यांच्या प्रेमाची सुरूवात कशी झाली याचा खुलासा केला आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

  अभिषेकने ऐश्वर्याला २००७मध्ये न्युयॉर्क मधील एका हॉटेलच्या बालकनीमध्ये प्रपोज केले होते. साखरपुडा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल सांगितले. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने ऐश्वर्याने अभिषेकशी लग्न केले, असे अनेकांना वाटते. या बद्दल बोलताना २०१४ मध्ये अभिषेकने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्ये सांगितले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

   

  “मी अभिनेता आहे किंवा बिग बींचा मुलगा आहे म्हणून ऐश्वर्याने माझ्याशी लग्न केले नाही. त्याच प्रमाणे ती विश्व सुंदरी किंवा अभिनेत्री असल्यामुळे मी तिच्याशी लग्न केले नाही. आमच्यात असलेल्या केमिस्ट्रीमुळे आम्ही लग्न केले.”