amir khan in lalsingh chadhdha

आलिया भट्ट आणि अक्षय कुमार यांच्या मागोमाग मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानही शूटिंगसाठी बाहेर पडला आहे.

    कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानं लॅाकडाऊनच्या निर्बंधांमध्ये काहीशी सलवत मिळाल्यानंतर मागील बऱ्याच दिवसांपासून घरीच बसलेले बॅालिवूड स्टार आता शूटिंगच्या मैदानात उतरू लागले आहेत. दरम्यानच्या काळात टीव्ही मालिकांनी परराज्यात आपला मुक्काम हलवत छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम सुरूच ठेवलं होतं, पण आता मोठ्या पडद्यावरील कलाकारही कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करत शूटिंग करू लागले आहेत.

    फिल्म इंडस्ट्री हब मानल्या जाणाऱ्या मुंबईत कलाकार-तंत्रज्ञांना बायो बबलमध्ये राहून सायंकाळी ५ वाजेपर्यंत शूटिंग करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार आपले रखडलेले प्रोजेक्टस पूर्ण करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आलिया भट्ट आणि अक्षय कुमार यांच्या मागोमाग मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खानही शूटिंगसाठी बाहेर पडला आहे.

    आमिर मागील बऱ्याच दिवसांपासून ‘लाल सिंग चढ्ढा’ या आगामी चित्रपटाच्या कामात बिझी आहे. या चित्रपटाचं छोटंसं शूटिंग शेड्यूल पूर्ण करण्यासाठी आमिरनं कॅमेरा फेस केला आहे. दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करत शूट सुरू केलं आहे.