५७ व्या वाढदिवसानंतर आमिर खानने घेतला धक्कादायक निर्णय, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला जबरदस्त धक्का!

सर्व चाहत्यांचे आमिरने आभार मानले आहेत. त्याचबरोबर एक धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. आमिरनं त्याच सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

    अभिनेता आमिर खानने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. ५६ व्या वाढदिवासाच्या दिवशी चाहत्यांनी शुभेच्छांचा भरभरून वर्षाव आमिरवर केला. या सर्व चाहत्यांचे आमिरने आभार मानले आहेत. त्याचबरोबर एक धक्कादायक निर्णय जाहीर केला आहे. आमिरनं त्याच सोशल मीडिया अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

     

    आमिरने पोस्टमध्ये म्हटलं आहे

    “नमस्कार मित्र-मंडळींनो तुम्ही वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा मला दिल्या. याबद्दल तुमचे मनापासून आभार. आज मी एक महत्वाची घोषणा करतोय. मी सोशल मीडियाचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया सोडलं असलं तरी आपला संवाद थांबणार नाही. पूर्वीसारखेच आपण भेटत राहू. धन्यवाद” अशा आशयाचं ट्विट आमिर खाननं केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

    आमिर खाननं मोबाईलपासून दूर राहायचं ठरवलं आहे. लाल सिंह चड्ढा’ रिलीज होईपर्यंत मोबाइल वापरणार नाही असं आमिरनं सांगितलं आहे. अभिनेत्याच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार आमिर खाननं लाल सिंह चड्ढाच्या शूटिंगमध्ये काही कालावधीसाठी ब्रेक घेतला होता आता पुन्हा त्यानं या फिल्मचं शूटिंग सुरू केलं आहे. या वर्षात ख्रिसमसला ही फिल्म रिलीज होणार आहे.