aani kashinath ghanekar

दोन वर्षापूर्वी दिवाळी पाडव्याच्या मुहूतांवर अभिनेता सुबोध भावेचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा आणि… काशिनाथ घाणेकर’ (aani kashinath ghanekar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटाच्या टिझरपासून संवाद, गाणी यांची चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाली होती. चित्रपटााही पहिल्या दिवसापासून, पहिल्या शोपासून प्रेक्षकांचा ‘एकदम कडक’ प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. ‘ नेटपिलक्स’ (netflix) वर हा चित्र प्रेक्षकांना पाहता येणार आहे. चित्रपटामधील कलाकारांचा उत्तम अभिनय, कथा यामुळे रक्षकांनी चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला होता.

यामध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या उदय-अस्ताचा प्रवास दाखविण्यात आला आहे. सुबोध भावेने डॉ. काशिनाथ घाणेकर यांची भूमिका साकारली. काशिनाथ घाणेकर यांचा लूक, संवाद फेक, अस्वस्थता, ‘बिनधास्तपणा, बेफिकीरीपणा, त्यांच अभिनयाबद्दल  वेड हे अतिशय  उत्तमप्रकारे सुबोध भावेने साकारले. चित्रपटामधील सोनाली कुलकर्णी  सुमित राघवन, आनंद जोशी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, वैदही परशुरामे, नंदिता धुरी यांच्या भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या होत्या. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे.