आथियासोबत राहुलचं चाललंय काय? नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

न्युमी पॅरीस या ब्रँडनं आथिया आणि राहुलला ग्लोबल अॅम्बेसेडर बनवलं आहे. हा ब्रँड लक्झरी आयवेअरसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या ब्रँडच्या प्रमोशनची जबाबदारी आता आथिया-राहुल या जोडीनं स्वीकारली आहे.

    बॅालिवूड आणि क्रिकेटचं खूप जुनं नातं आहे. अगदी पतौडी, अजहरच्या अगोदरच्या काळापासूनचं हे नातं विराट कोहली-अनुष्का शर्मापर्यंतच्या पिढीनं जपलं आहे. त्यामुळं एखादा क्रिकेटर आणि अभिनेत्री एकत्र आली की त्यांच्यात काहीतरी गुटरगू सुरू असल्याची चर्चा होते. सध्या सुनील शेट्टीची मुलगी आथिया आणि भारतीय क्रिकेट संघतील विकेटकीपर-बॅटसमन के. एल. राहुल यांच्याबाबत इंडस्ट्रीत चर्चा सुरू आहे.

    दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. या दोघांचं नेमकं काय चाललंय हे जाणून घेण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत, पण कोणालाही त्याचा मागमूसही लागलेला नाही. आता ही जोडी एका ब्रँड प्रामोशनच्या निमित्तानं प्रथमच एकत्र आली आहे. न्युमी पॅरीस या ब्रँडनं आथिया आणि राहुलला ग्लोबल अॅम्बेसेडर बनवलं आहे. हा ब्रँड लक्झरी आयवेअरसाठी जगभर प्रसिद्ध आहे. या ब्रँडच्या प्रमोशनची जबाबदारी आता आथिया-राहुल या जोडीनं स्वीकारली आहे.

    दोघांनीही स्टायलीश न्यूमी पॅरीस सनग्लासेस घातलेले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या ब्रँडच्या खरेदीच्या माध्यमातून अंधत्वाविरोधात लढणाऱ्या एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट या वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन सेंटरसोबत काम करणाऱ्या संस्थेला मदत करण्याची संधी मिळणार असल्याचंही दोघांनीही सोशल मीडियावर लिहीलं आहे.