पुन्हा येतेय ‘ड्रीम गर्ल’, सिक्वेलची तयारी सुरू!

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केलाच, पण त्यासोबतच टेलिव्हीजनवरही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

    आयुष्मान खुरानाचे सर्वच चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. ‘ड्रीम गर्ल’ हा देखील त्याच वाटेवरला आणखी एक चित्रपट आहे. बेरोजगार असलेला आयुष्मान नोकरी मिळवण्यासाठी या चित्रपटात कॉल सेंटरमध्ये मुलींच्या आवाजात संभाषण साधण्याचं काम करू लागतो. त्यानंतर जो घोळ होतो तो चित्रपटात पाहताना हसून-हसून पोट दुखू लागतं.

    एकता कपूरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात आयुष्मानसोबत नुसरत भरूचा मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन राज शांडील्य यांनी केलं होतं. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस केलाच, पण त्यासोबतच टेलिव्हीजनवरही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

    याच कारणामुळं आता या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शांडील्य सध्या एका स्क्रीप्टवर काम करत आहेत, पण हा नेमका कोणता चित्रपट आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. ते नेमकी कोणत्या चित्रपटाला अगोदर सुरुवात करणार हे या महिन्याअखेरपर्यंत क्लीअर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.