‘या’ अभिनेत्याच्या नावाचं सावरकरांच्या भूमिकेसाठी शिक्कामोर्तब, इतर कलाकारांच्या नावाबाबत उत्सुकता कायम!

या चित्रपटात सावरकरांच्या रूपात कोणता कलाकार दिसणार याबाबतच चर्चा सुरू झाली आहे. राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना हे दोन तगडे कलाकार या शर्यतीत सामील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

    स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधत महेश मांजरेकरांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. निर्माते संदिप सिंग या चित्रपटाचं शिवधनुष्य उचलण्यासाठी पुढे सरसावले आहेत. महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या या चित्रपटाची भव्य निर्मिती करण्याची योजना आखण्यात आली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून यात टायटल रोल कोण साकारणार या चर्चेला उधाण आलं आहे.

    या चित्रपटात सावरकरांच्या रूपात कोणता कलाकार दिसणार याबाबतच चर्चा सुरू झाली आहे. राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना हे दोन तगडे कलाकार या शर्यतीत सामील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हा चॅलेजिंग रोल साकारण्यासाठी त्याच ताकदीच्या कलाकाराची गरज असून, सावरकरांच्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याची पूर्ण क्षमता या दोन्ही कलाकारांमध्ये आहे. यात आयुष्मानला झुकतं माप मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    राजकुमारचे सध्या बरेच चित्रपट रांगेत असल्यानं त्यांचं शूटिंग पूर्ण करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळं सावरकरांच्या भूमिकेसाठी आयुष्मान फर्स्ट चॅाईस असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळं सावरकरांच्या भूमिकेसाठी कोणत्या कलाकाराच्या नावाची घोषणा होते ते पहायचं आहे.