‘शो आवडला नव्हता तर त्यांनी तेव्हाच सांगायला हवे होते’, अमित कुमारांवर अभिजीत नाराज!

अभिजीत सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर अमित कुमार यांना शो आवडला नव्हता तर त्यांनी तेव्हाच सांगायला हवे होते. त्यांना शोमधील स्पर्धकांनी गायिलेली गाणी आवडत नाहीत असे सांगायचे होते.

    सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी इंडियन आयडल १२मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी शोवर टीका केली होती. आता पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने त्यांना सुनावले आहे.

    अमित कुमार यांनी हजेरी लावलेल्या एपिसोडमध्ये परिक्षक आणि स्पर्धकांनी मिळून १०० गाणी गायिली आणि किशोर कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. पण परिक्षक नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी गाणे गायल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात होते. दरम्यान एका मुलाखतीमध्ये अमित कुमार यांनी ‘मला माहिती आहे की लोकं त्या एपिसोड विषयी वाईट बोलत आहेत. शोमध्ये स्पर्धकाने कसेही गाणे गायिले तरी मला त्यांची प्रशंसा करण्यासाठी सांगण्यात आले होते. तसेच त्यासाठी ते मला चांगले मानधन देणार होते’ असे म्हटले होते. आता अभिजीत सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर अमित कुमार यांना शो आवडला नव्हता तर त्यांनी तेव्हाच सांगायला हवे होते. त्यांना शोमधील स्पर्धकांनी गायिलेली गाणी आवडत नाहीत असे सांगायचे होते. एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना स्पर्धकांनी गायिलेली गाणी आवडली नाही असे बोलायला नको होते.’

    पुढे तो म्हणाला, ‘मला असे वाटते की अमित यांनी आधीच सांगितले असते की शोचा कंटेंट किंवा स्पर्धकांनी गायिलेली गाणी आवडली नाहीत. तर स्पर्धकांनी आणखी मेहनत घेऊन चांगली गाणी गायिली असती