सलमान खान आणि त्याच्या कुटंबियांनी माझे करिअर संपवण्याचा केला होता प्रयत्न – बॉलिवूडमधील नेपोटीझमबाबत अभिनव कश्यपची पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. मात्र सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील नेपोटीझम जबाबदार असल्याचे दिग्दर्शक अभिनव कश्यप याने म्हटले आहे. तसेच सलमान खान आणि त्याच्या

 अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली. मात्र सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील नेपोटीझम जबाबदार असल्याचे दिग्दर्शक अभिनव कश्यप याने म्हटले आहे. तसेच सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी माझे करिअर संपवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोपही अभिनव कश्यप याने केला आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अभिनवने एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात त्याने सुशांतच्या आत्महत्येसाठी नेपोटिझम जबाबदार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सलमान खान आणि यशराज फिल्म्सवरही त्याने टीका केली आहे.

 माझेसुद्धा बॉलिवूडमधील नेपोटीझममुळे शोषण झाले आहे. अरबाज खानला चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे होते म्हणून माझ्याकडून दबंग २ काढून घेण्यात आला. त्या विरोधात मी बोललो तर माझ्याकडचे इतर प्रोजेक्ट्ससुद्धा काढून घेण्यात आले. तसेच अजून गंभीर परिणाम भोगावे लागण्याची धमकीही मिळाल्याचे अभिनव याने सांगितले आहे. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांनी माझे करिअर संपवण्याचा खूप प्रयत्न केला. अनेक करार अचानक तोडण्यात आले, अशी पोस्ट अभिनव याने टाकली आहे. अभिनव हा अनुराश कश्यपचा भाऊ आहे.