अभिषेक बच्चनने केली कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अभिनेता अभिषेक बच्चन यांच्याबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. अभिषेक बच्चन आता कोरोनातून बरे झाले आहेत. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.अभिषेकने ट्विट करून कोरोना निगेटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.

 अभिषेक बच्चनवर गेले २८ दिवस उपचार सुरु होते. आज अखेर तो कोरोनातून मुक्त झाला आहे. मी कोरोनावर मात करीन हे वचन दिले होते ते आता पूर्ण केल्याचे अभिषेकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याने कोरोनातून बरे होण्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टर,नर्सेस यांचेही आभार मानले आहेत.