abhishek bacchan

या आधी अभिषेकने ‘लुडो’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याचे नाव Abhishek A Bachchan असे लिहिले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

  बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचे आजवर अनेक चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप ठरले. अनेकवेळा तो कारणामुळे ट्रोलही झाला आहे. पण अभिषेकने याकडे दुर्लक्ष केले. पण आता अभिषेकने त्याच्या नावात बदल केला असल्याचे समोर आलं आहे. त्याने हे त्याचा आगामी चित्रपट हिट होण्यासाठी केलं असल्याचं म्हटलं जात आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

  अभिषेकने त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये असे पहिल्यांदा केले आहे. नुकताच त्याचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहता त्यामध्ये अभिषेकने त्याच्या नावात आणखी एक ‘A’ जोडला आहे. त्यामुळे Abhishek Bachchanच्या ऐवजी Abhishek A Bachchan असे दिसत आहे. अभिषेकने त्याच्या नावात वडिल अमिताभ बच्चन यांच्या नावाचे पहिले अक्षर ‘A’ लिहिण्यास सुरुवात केली असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

  या आधी अभिषेकने ‘लुडो’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी त्याचे नाव Abhishek A Bachchan असे लिहिले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नावात बदल केल्यामुळे अभिषेकला करिअमध्ये फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे. आता अभिषेकचा ‘द बिग बुल’ हा चित्रपट किती कमाई करणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)