आता अभिषेक बच्चन उघडकीस आणणार भारतातील सगळ्यात मोठा घोटाळा, Video केला सोशल मीडियावर शेअर

या चित्रपटाच्या टीझरमध्ये एका ब्रोकरचा स्टॉक मार्केटमधला सर्वात शक्तीशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास थोडक्यात दाखवला आहे. या चित्रपटाचा निर्माता अजय देवगण याने या टीझरमधून प्रमुख पात्राची ओळख करुन देण्यासाठी आवाज दिला आहे.

  स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित नवा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘बिग बुल’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होईल. यात अभिषेक बच्चन मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

  या चित्रपटाच्या टीझरमध्ये एका ब्रोकरचा स्टॉक मार्केटमधला सर्वात शक्तीशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास थोडक्यात दाखवला आहे. या चित्रपटाचा निर्माता अजय देवगण याने या टीझरमधून प्रमुख पात्राची ओळख करुन देण्यासाठी आवाज दिला आहे. या चित्रपटाच्या टीमने हा टीझर प्रदर्शित केला आहे.

  या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकी गुलाटी यांचं आहे.तर अजय देवगणने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १९ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.