अभिजितचा सस्पेन्स थ्रिलर, ‘भ्रम’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत!

अभिजितसह या चित्रपटात इलाक्षी गुप्ता, किरणदीप कौर, सिद्धेश्वर झाडबुके, भूषण मंजुळे, शिवराज वाळवेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या.

    ‘टकाटक’, ‘एक सांगायचय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेता अभिजित आमकर एका नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. ‘भ्रम’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट एक सस्पेन्स थ्रिलर आहे. क्राईम थ्रिलर असा विषय घेऊन अभिजित या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिजित श्रीमंत वडिलांच्या मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. परिस्थितीनुसार सामोरा जाणाऱ्या किंवा सकारात्मक विचारशैलीने जगणाऱ्या एका मुलाची भूमिका तो साकारताना दिसणार आहे.

    या चित्रपटाबाबत बोलताना अभिजित म्हणाला की, तरुण कलाकार एकत्र येऊन एका वेगळ्याच ऊर्जेने ही ‘भ्रम’ फिल्म चित्रित करण्यात आली. चित्रीकरण्यादरम्यान असलेल्या सीन आणि विशेष लोकेशनमुळे खूप मज्जा आली. या चित्रपटाचे चित्रीकरण पिबीए फिल्मसिटीमध्ये करण्यात आले आहे.

    अभिजितसह या चित्रपटात इलाक्षी गुप्ता, किरणदीप कौर, सिद्धेश्वर झाडबुके, भूषण मंजुळे, शिवराज वाळवेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन वैभव लोंढे यांनी केले आहे. चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अँजेला आणि तेजस भालेराव यांनी सांभाळली आहे.