भाजपच्या रामायणाचा नवा सिझन, सीतेनंतर रामाचाही पक्षप्रवेश!

हिंदी, भोजपूरी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये अरुण गोविल यांनी काम केलं आहे. १९९१ मध्ये म्हणजेच 30 वर्षांपूर्वी रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकरणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता रामाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ही खेळी खेळल्याचं म्हटलं जातं. त्याचबरोबर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

    हिंदी, भोजपूरी व्यतिरिक्त अनेक भाषांमध्ये अरुण गोविल यांनी काम केलं आहे. १९९१ मध्ये म्हणजेच 30 वर्षांपूर्वी रामायण मालिकेत सीतेची भूमिका साकरणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी भाजपमधून निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता रामाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

    दीपिका चिखलिया यांनी १९९१ मध्ये भाजपच्या तिकिटातून वडोदारामध्ये निवडणूक लढवली आणि जिंकली होती. भाजप प्रवेशाबाबत त्यांनी एक किस्सा शेअर केला होता. यानुसार गुजरातमध्ये एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अरविंद त्रिवेदी यांची भेट झाली. त्यांनी मालिकेत रावणाची भूमिका साकरली होती. ते दीपिका यांना म्हणाले की, तुम्हाला आडवाणीजी शोधत आहे, त्यांना तुमचा नंबर हवा आहे. आडवाणींची भेट झाल्यानंततर त्यांनी भारतीय जनता पक्षात येण्याबद्दल विचारलं आणि मी राजकारणात जोडले गेले.

    त्यानंतर अरुण गोविल यांच्या पक्षप्रवेशानंतर मोठी चर्चा सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठी अरुण गोविल यांच्यावर काय जबाबदारी सोपवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहेत.