bikram jeet kanwarlal

अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (Bikramjeet Kanwarpal Death) यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते.

    कोरोनाच्या फटक्याने आणखी एका उत्कृष्ट अभिनेत्याचं निधन झालं आहे. लोकप्रिय अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल (Bikramjeet Kanwarpal Death) यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजमध्येही बिक्रमजीत कंवरपाल यांच्या भूमिका गाजल्या.

    कोरोना संसर्गानंतर उपचार सुरु असताना बिक्रमजीत कंवरपाल यांचे निधन झाले आहे. अनेक चित्रपटात त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. स्पेशल ऑप्स या वेब सीरीजमधील त्यांची भूमिका लोकांना खूप आवडली.


    चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी ट्विटरवरुन बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे. “गुणी अभिनेता मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांचे कोरोना संसर्गाने आज सकाळी निधन झाल्याची दुःखद वार्ता समजली. निवृत्ती सैन्य अधिकारी कंवरपाल यांनी अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांचे सांत्वन” असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    बिक्रमजीत कंवरपाल यांचे गाजलेले चित्रपट – पेज थ्री, पाप, करम, कॉर्पोरेट, हायजॅक, आरक्षण, मर्डर टू, रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ दि इयर, द गाझी अटॅक, टू स्टेट्स, जब तक है जान, ग्रँड मस्ती, हे बेबी, प्रेम रतन धन पायो

    बिक्रमजीत कंवरपाल यांनी २००३ मध्ये सैन्यदलातून निवृत्ती घेतल्यानंतर अभिनयात पदार्पण केलं. पेज थ्री, रॉकेट सिंग – सेल्समन ऑफ दि इयर, आरक्षण, मर्डर टू, द गाझी अटॅक, टू स्टेट्स यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. दिया और बाती हम, ये है चाहते, दिल ही तो है, २४ या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत.