dhanush

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी बरोबरच अभिनेता धनुषने बॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे टॉलिवूड आणि बॉलिवूड गाजवल्यानंतर धनुष पुन्हा एकदा हॉलिवूड गाजवण्यास सज्ज झाला आहे. त्यामुळे धनुष आता हॉलिवूडची वारी करणार आहे. त्यामुळे तरूणींच्या गळ्यातला ताईत असलेला धनुष लवकरच हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुष बरोबर क्रिस एव्हान्स (Chris Evan), रेयान गॉसलिंग आणि Ana de Armas हे नावाजलेले कलाकार स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट एक स्पाय सिनेमा असल्याचं सांगण्यात येत आहे. याविषयी नेटफ्लिक्सने ट्वीट करून माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

हाय बजेट फिल्म

धनुषचा हा नवा चित्रपट ‘द ग्रे मॅन’ मार्क ग्रिनी यांच्या कादंबरीवर आधारित आहे. हा सगळ्यात महागडा सिनेमा आहे. या चित्रपटासाठी २०० मिलियन डॉलर म्हणजे साधारण १५०० कोटींचं बजेट आहे. तसंच या चित्रपटाची पटकथा जो रुसो (Joe Russo) ,ख्रिस्तोफर मार्कस आणि स्टिफन मॅकफिली यांनी लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Dhanush (@dhanushkraja)

धनुषने The Extraordinary Journey of the Fakir या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय सिनेमात पदार्पण केलं होतं. २०१९ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्यानंतर आणखी एक नवा हॉलिवूड चित्रपट धनुषला मिळाला आला.