अभिनेता दिलीप कुमार यांच्या धाकट्या बंधूंचे कोरोनाने निधन

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू अस्लम खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.नव्वद वर्षीय अस्लम खान यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. ते लीलावती रुग्णालयामध्ये उपचारघेत होते.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग होता.

दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसास खान हे देखील कोरोनाची लागण झाल्याने लीलावती रुग्णालयामध्ये भरती आहेत. दरम्यान एहसास यांची तब्येत देखील गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. एहसास यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.