‘तोंडावर गोड बोलून पाठ फिरताक्षणीच अत्यंत कडू बोलणारे ….’अभिनेता प्रसाद ओकची ‘ती’ पोस्ट होतेय जबरदस्त व्हायरल, फोटोचीही रंगलीये चर्चा कारण…!

प्रसादचा ‘पिकासो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अमेझॉन प्राइमवर येत्या १९ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. काल या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.

  अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओकची सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा आहे. प्रसाद ने शेअर केलेला फोटो आणि लिहिलेली पोस्ट यावेळी चर्चेत आली आहे.

  या फोटोत असे काय खास आहे, तर प्रसादने घातलेली लाल रंगाची टी-शर्ट आणि त्यावरचा मॅसेज. ‘देवाक काळजी,’ (असे या टी-शर्टवर लिहिलेले आहे. या फोटोसोबतची प्रसादची पोस्टही खास आहे. तोंडावर गोड बोलणारे आणि पाठ फिरताच निंदा नालस्ती करणा-यांना त्याने यातून सुनावले आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prasad Oak (@oakprasad)

  प्रसाद म्हणतो..

  तोंडावर गोड बोलून

  पाठ फिरताक्षणीच अत्यंत कडू बोलणारे किंवा अपरोक्ष निंदा करणारे,

  अनेक मित्र, मैत्रिणी, नट, नट्या, दिग्दर्शक…सध्या आसपास आहेत…

  माझा आत्मविश्वास ढळावा म्हणून

  हे सगळे अविरत कार्यरत आहेत…

  पण तरी माझ्या चेहऱ्यावरचं हसू

  असंच कायम अबाधित आहे आणि राहणारच…

  कारण 1) माझी कामावरची निष्ठा, 2) तुम्हा रसिकांचा सदैव असलेला पाठींबा आणि प्रेम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे

  3) देवाक काळजी…!!!

  या तिन्ही गोष्टी शाबूत आहेत तोपर्यंत घाबरायचं कशाला????

  तुझ्या हाती आहे डाव सारा

  इसर गजाल कालची रे

  देवाक काळजी रे

  माझ्या देवाक काळजी रे

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Prasad Oak (@oakprasad)

   

  प्रसादचा ‘पिकासो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अमेझॉन प्राइमवर येत्या १९ मार्चला हा सिनेमा प्रदर्शित होतोय. काल या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता.