kangana

गेल्या वर्षी एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी तिची आणि कुमारची भेट झाली होती. त्यानंतर कुमारने तिला लग्नासाठी विचारणा केली.

    अभिनेत्री कंगना राणावतच्या अंगरक्षकाला अटक करण्यात आल्याचं समजत आहे. त्याच्यावर बलात्कार आणि फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार हेगडे असं या अंगरक्षकाचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी त्याला त्याच्या मूळ गावातून अटक केली.

    एका ३० वर्षीय महिलेने कुमारवर हे आरोप केले आहेत. तिच्या आरोपांनुसार, गेल्या वर्षी एका चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी तिची आणि कुमारची भेट झाली होती. त्यानंतर कुमारने तिला लग्नासाठी विचारणा केली. तसंच त्याने लग्नापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याबाबतही आग्रह धरला.

    महिलाही त्याच्यासोबत राहायला तयार झाली. त्याने तिला शरीरसंबंध ठेवण्यासही भाग पाडलं. तसंच तिच्याकडून आईच्या उपचारांसाठी ५० हजार रुपये उसने घेतले. त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क बंद केला. त्यामुळे या तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कुमारला त्याचं मूळ गाव असलेल्या कर्नाटक येथील मांड्या या गावातून अटक केली.