ना साडीची चिंता, ना आजू-बाजूच्या लोकांची, महिलेने एका सेल्फीसाठी भरबाजारात काढल्या पूशअप्स, Video होतोय व्हायरल!

जर तुम्हाला मिलिंद सोमणसोबत फोटो काढायचा असेल तर तुम्हाला पुशअप मारावे लागणार असे म्हटले होते. आता एका महिलेने सेल्फी काढण्यासाठी मिलिंदची ही अट मान्य केली आहे.

  अभिनेता मिलिंद सोमणने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. आज मिलिंद फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. तो सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतो. त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. पण मिलिंद पुशअप काढून दाखवल्याशिवाय सेल्फी देत नाही. चक्क एका महिलेने सेल्फी काढण्यासाठी पुशअप मारले आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

  मिलिंदने सोशल मीडिया पोस्टवर एक फोटो शेअर केले होता. हा फोटो शेअर करत त्याने ‘Pushups for selfie!’ असे म्हटले होते. मिलिंदने त्याच्यासोबत सेल्फी काढाणाऱ्यांसाठी एक अट घातली होती. जर तुम्हाला मिलिंद सोमणसोबत फोटो काढायचा असेल तर तुम्हाला पुशअप मारावे लागणार असे म्हटले होते. आता एका महिलेने सेल्फी काढण्यासाठी मिलिंदची ही अट मान्य केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

  मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर महिलेचा पुशअप्स मारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘. रायपूरच्या एका छोट्या बाजारात मी होतो. तेथील चविष्ठ पदार्थांचा आस्वाद घेत होतो. तिथे एका महिलेने मला सेल्फीसाठी विचारलं. मी म्हटलं १० पुशअप मारावे लागतील. त्या महिलेने कोणाताही विचार न करता मी माझ्या मोबाइलचा कॅमेरा ऑन करण्याआधीच १० पुशअप्स मारण्यास सुरुवात केली’ असे म्हटले.

  पुढे तो म्हणाला, ‘ना साडीची चिंता, ना आजू-बाजूच्या लोकांची, कधीही पुशअप केले नाहीत याची तक्रार नाही. तिने कोणतेही कारण दिले नाही. कधी-कधी तुम्हाला आनंदी जीवनासाठी सक्षम होण्याची फार गरज असते. फक्त तुमच्याकडे हो मी हे करु शकतो बोलण्याची क्षमता लागते.’