Video तालिबानला समर्थन देणाऱ्या भारतीय मुस्लिमांवर अभिनेते नसरूद्दीन शहा भडकले म्हणाले, हे तर…

नसरूद्दीन शहा म्हणत आहे की भारतीय मुस्लिमांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा की त्यांना त्यांच्या धर्मामध्ये सुधारणा करायची आहे की जुन्या चालीरीतींप्रमाणे जगायचे आहे.

  हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नसरूद्दीन शहा यांनी तालिबानचे समर्थन करणाऱ्या भारतीय मुस्लिमांना तालिबानचा विजय साजरा करू नये, असा सल्ला दिला आहे. त्यांनी बुधवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यामध्ये ते हिंदुस्तानी इस्लामबद्दल स्पष्टीकरण देताना दिसत आहेत. नसरूद्दीन शहा म्हणत आहे की भारतीय मुस्लिमांनी स्वतःला हा प्रश्न विचारावा की त्यांना त्यांच्या धर्मामध्ये सुधारणा करायची आहे की जुन्या चालीरीतींप्रमाणे जगायचे आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by News24 India (@news24official)

  काय आहे व्हिडिओत

  व्हिडिओमध्ये नसीरुद्दीन शाह म्हणत आहेत की, ‘अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे राज्य जगासाठी चिंतेची बाब असली तरी, त्या मुर्खांच्या परत येण्यावर भारतीय मुस्लिमांच्या काही वर्गाचा उत्सव कमी धोकादायक नाही. आज प्रत्येक भारतीय मुसलमानाने स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा की त्याला आपल्या धर्मात सुधारणा आणि आधुनिकता हवी आहे की त्याला गेल्या शतकांप्रमाणेच जगायचे आहे?

  ते पुढे म्हणाले, ‘मी एक भारतीय मुस्लिम आहे आणि मिर्झा गालिबने म्हटल्याप्रमाणे, अल्लाह मियांशी माझे संबंध खूप वेगळे आहेत, मला कोणत्याही राजकीय धर्माची गरज नाही. हिंदुस्थानी इस्लाम हा जगभरातील इस्लामपेक्षा नेहमीच वेगळा राहिला आहे आणि देव तो काळ इतका बदलू नये की आपण ते ओळखूही शकणार नाही.

  तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूल काबीज केले. राष्ट्राध्यक्ष असरफ गनी देश सोडून युएईला गेले, त्यानंतर तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानचा ताबा घेतला.