‘द बॅटमॅन’ मधील अभिनेत्याला कोरोनाची लागण

कोरोनाचा प्रादुर्भाव आता वाढत चालला आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड आणि आता हॉलिवूडमध्येही(hollywood) कोरोनाची(corona) लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सनला (robert pattinson)  आता कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अमेरिकेत ‘द बॅटमॅन’(the batman) चित्रपटाचे(movie) चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.

‘द बॅटमॅन’च्या प्रॉडक्शन कंपनीने एक पत्रक सादर केले आहे. या पत्रकामध्ये त्यांनी ‘द बॅटमॅन’ च्या एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.पत्रकात कोरोनाग्रस्त कोण आहे याचा उल्लेख नाही मात्र हॉलिवूडमधील वेबसाईट्सनी रॉबर्ट पॅटिन्सन’ ला कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. काही काळासाठी चित्रपटाचे चित्रीकरण थांब‌‌वण्यात आले असल्याचे पत्रकात लिहिले आहे. चित्रपटाचे ३ महिन्याचे चित्रीकरण अजून बाकी असल्याची माहिती मिळाली आहे.