prabhas

'बाहुबली' सुपरस्टार प्रभासच्या आगामी 'सलार' सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन 'केजीएफ' सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन करणारा प्रशांत नील करत आहे. काही दिवसांपूर्वीच चर्चा सुरू होती की, प्रभास आणि प्रशांत सोबत काम करणार आहेत. या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

‘बाहुबली’ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘सलार’ सिनेमाचे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन ‘केजीएफ’ सारख्या सिनेमाचे दिग्दर्शन करणारा प्रशांत नील करत आहे. काही दिवसांपूर्वीच चर्चा सुरू होती की, प्रभास आणि प्रशांत सोबत काम करणार आहेत. या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

सध्या या सिनेमाचे प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. हा एक अ‍ॅक्शन सिनेमा असेल आणि पोस्टरमध्ये प्रभासचा लूक फारच इंटेन्सही दिसत आहे. हे फर्स्ट लूक पोस्टर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘सर्वांत जास्त हिंसक एका व्यक्तीला सर्वांत जास्त हिंसक म्हणतात’. प्रशांत नीलने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले. असेही सांगितले जात आहे की, या सिनेमाचे शूटिंग पुढील वर्षाच्या मध्यात सुरू होईल. पण अजूनही सिनेमाच्या इतर स्टारकास्टबाबत सांगण्यात आलेले नाही. मात्र हे ठरलंय की, हा सिनेमा भारतातील 5 भाषांमध्ये रिलीज केला जाईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)