prashant damle

अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झालीये. त्यामुळे आता एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचे प्रयोग रद्द करण्यात आलेत. फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली. डॉक्टरांनी सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्यामुळे नाटकाचे दोन प्रयोग रद्द केल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितले.

काय म्हणाले प्रशांत दामले?

प्रशांत दामले म्हणतात, “मागच्या रविवारी चिंचवडचा प्रयोग झाला तेव्हा मला कणकण वाटत होती. त्यामुळे मी बुधवारी करोना टेस्ट करुन घेतली. त्यात मी काठावर पास झालो आहे. तसा काठावर पास मी शाळेपासूनच आहे. पण हा काठ जरा डेंजर आहे. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की काठावर जरी असलात तरीही सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये तुम्हाला रहावं लागेल. म्हणून मी बुधवारपासून सात दिवसांच्या आयसोलेशनमध्ये आहे. पण त्यामुळे  उद्या दुपारचा बोरीवलीचा प्रयोग आणि परवा दुपारचा गडकरी रंगायतनचा प्रयोग हे रद्द करावे लागले आहेत. सध्या मी ठणठणीत आहे. पण डॉक्टर म्हणत आहेत की तुला सात दिवस विश्रांती घ्यावीच लागेल. सगळ्यात दिलासा देणारी गोष्ट ही आहे की माझे सगळे सहकलाकार, बॅक स्टेजचे आर्टिस्ट हे ठणठणीत आहेत. मीच थोडासा काठावर आहे. काठावरचा मी थोडासा मागे येतो आणि परत काम सुरु करतो. मी काळजी घेतो तुम्हीही काळजी घ्या.” असं म्हणत प्रशांत दामले यांनी व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सरकारची परवानागी मिळाल्यानंतर १२ डिसेंबरला पुण्यात एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग झाला होता. तसंच चिंचवडलाही एक प्रयोग झाला होता. यानंतर प्रशांत दामले जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना कणकण जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी बुधवारी करोना चाचणी केली जी पॉझिटिव्ह आली आहे अशी माहिती प्रशांत दामले यांनी दिली आहे. लॉकडाउनच्या काळात नाटक, सिनेमा सगळंच बंद होतं. ते लवकर सुरु व्हावं यासाठी प्रशांत दामले आणि इतर नाट्यकर्मींनी पुढाकार घेतला होता.