मी त्याचा शेवटचा कॉल उचलला असता तर…., मामाच्या निधनानंतर अभिनेता पुष्कर जोग झाला भावुक!

मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली .काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याची पोस्ट मी टाकली होती. त्या वेळेसचा मिस्ड कॉल माझं मन अजून हि खात आहे ..

    कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसात अनेक कलाकारांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर अनेकांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्याला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. अभिनेता पुष्कर जोगला देखील कोरोनामुळे त्याच्या मामाला गमवावं लागलं आहे. मामाच्या मृत्यूनंतर पुष्करने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत त्याने एक खंत व्यक्त केलीय.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

    व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सध्याच्या काळात आपण एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं असल्याचं पुष्कर म्हणाला आहे. ” तुमच्या जिव्हाळ्याच्या माणसांची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधा”

    “मी व्यक्त होण्याचा विचार करत होतो आज थोडी हिम्मत झाली .काही दिवसांपूर्वी माझा मामा गेल्याची पोस्ट मी टाकली होती. त्या वेळेसचा मिस्ड कॉल माझं मन अजून हि खात आहे .. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे कृपा करून एकमेकांच्या संपर्कात रहा. लॉक डाऊन असल्यामुळे सर्वांशी संपर्क होत नाहीयं. हे योग्य नाही. हा काळ आपल्या सर्वांसाठी प्रचंड कठीण आहे. तेव्हा हेवे दावे,  रुसवे फुगवे,  वैचारिक मतभेद सर्व काही प्लिज प्लिज बाजूला ठेवा आणि आपल्या नातेवाईक, मित्र परिवार व आप्त स्वकीयांसह संपर्कात रहा. कॉल मेसेज तर कधीच कुणाचा कॉल मिस करू नका. अशी माझी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे .लवकरच हा वाईट काळ सरेल आणि आपण सर्व पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू .”