raja and palak

पलक तिवारीने तब्बल १३ वर्षांनंतर आपले वडिल राजा चौधरी(palak tiwari andh raja choudhary meeting after 13 years) यांची भेट घेतली. वडिल आणि मुलीच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

  अभिनेत्री पलक तिवारी(palak tiwari) नेहमी तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या ती एका वेगळ्याच पोस्टमुळे चर्चेत आली आहे. पलक तिवारीने तब्बल १३ वर्षांनंतर आपल्या वडिलांची भेट घेतली. वडिल आणि मुलीच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Raja Chaudhary (@rajachaudhary)

  पलक तिवारी ही श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांची मुलगी आहे. श्वेता आणि राज यांचा १३ वर्षांपुर्वी घटस्फोट झाला होता. त्यावेळी पलकला सांभाळण्याची जबाबदारी श्वेताने घेतली. पलकला आईकडे ठेवलं जावं, असे कोर्टाचे आदेश होते.

  तेव्हापासून राजा चौधरींनी आपली मुलगी पलक चौधरी हिची भेट घेतली नव्हती. मात्र आज १३ वर्षांनी राजा आणि पलक एकमेकांना भेटले.
  राजा यांनी याविषयी पोस्ट करताना लिहिले आहे की, “ माझ्या आयुष्यातील हा खास क्षण आहे. मी तिला १३ वर्षांनी भेटलो. तिला शेवटंच बघितलं तेव्हा ती खूपच लहान होती.”