रणवीरने स्विकारलं बेअर ग्रिल्सचं चॅलेंज, बॉलिवूडचा बाजीराव दिसणार ॲडव्हेंचर करताना!

रणवीर या शोसाठी उत्साही आहे. या शोचा बिग बजेट आहे. यावेळी ते पूर्वेकडील युरोपियन देशामध्ये या शोचे चित्रीकरण होणार आहे.

    रणवीर सिंग हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर हा कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या कपड्यांमुळे चर्चेत असतो. मात्र, यावेळी रणवीरच्या चाहत्यांसाठी एक वेगळी आणि आनंदाची बातमी आहे. रणवीर आता बेअर ग्रिल्सच्या शोच्या चित्रीकरणासाठी नुकताच परदेशात रवाना झाला आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

    रणवीर या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत अॅडव्हेंचर करताना दिसरणार आहे. नेटफ्लिक्सशी चर्चा केल्यानंतर बेअरने रणवीरला या शोसाठी विचारले होते. रणवीर या शोसाठी उत्साही आहे. या शोचा बिग बजेट आहे. यावेळी ते पूर्वेकडील युरोपियन देशामध्ये या शोचे चित्रीकरण होणार आहे. या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी,  रजनीकांत आणि अक्षयकुमारनेही बेअर ग्रिल्सच चॅलेंज स्विकारलं होतं.

    रणवीर लवकरच ‘८३’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये दिसणार आहे. त्यानंतर ‘सर्कस’, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.