अभिनेता रितेश देशमुखच्या मुलांनी म्हटली गणपतीची आरती, व्हिडीओ तुफान व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या निमित्तानं त्यानं सोशल मीडियावर एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडीओला पसंतीही तेवढीच भेटत असते. मात्र आता शेअर केलेल्या व्हिडीओचं सगळेचजण कौतुक करताना दिसत आहे.

  मुंबई : गणपती बाप्पांचं शुक्रवारी आगमन झालं आहे. त्यामुळे सगळीकडे आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पहायला मिळत आहे. अनेकांनी आपल्या घरात अगदी थाटामाटात बाप्पांचं स्वागत केलं आहे. दरम्यान अशातच बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या घरीही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. या निमित्तानं त्यानं सोशल मीडियावर एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.

  अभिनेता रितेश देशमुख नेहमीच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या व्हिडीओला पसंतीही तेवढीच भेटत असते. मात्र आता शेअर केलेल्या व्हिडीओचं सगळेचजण कौतुक करताना दिसत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

  या व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलियाची दोन्ही मुले ‘सुखकर्ता… दुःखहर्ता’ ही बाप्पाची सुंदर आरती म्हणत आहेत. रितेशचे दोन्ही मुलं रियान आणि राहिल दोघेही खूप गोड बाप्पांची आरती म्हणताना दिसत आहे. त्यामुळे या व्हिडीओवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आपल्या मुलांना चांगले संस्कार लावल्यामुळे रितेश आणि जेनेलियाचंही कौतुक होत आहे.

  दरम्यान, रियान आणि राहिलचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रितेश आणि जिनेलीयाची स्तुती केली आहे.