अभिनेता संग्राम समेळ दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, पहिली पत्नी होती अभिनेत्री तर दुसऱ्या पत्नीबद्दल जाणून घ्या!

मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटकापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ललित २०५' या मालिकेत तो दिसला होता.

  अभिनेता संग्राम समेळ लग्नाच्याबेडीत अडकला आहे. इचलकरंजीला हा लग्न सोहळ पार पडला. संग्रामच्या लग्नाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर शेअर केले आहेत.  संग्रामची पत्नी श्रद्धा फाटक डान्सर आहे. तिचे डान्सचे फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. संग्रामचे हे दुसरं लग्न आहे. संग्रामच हे दुसरं लग्न आहे. २०१६ ला संग्रामचं पल्लवी पाटीलसोबत लग्न झाले होते मात्र काही कारणामुळे दोघे वेगळे झाले.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Sangram Samel (@sangramsamel)

  मालिका, चित्रपट व नाटक अशा तिन्ही माध्यमातून अभिनेता संग्राम समेळने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. नाटकापासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ललित २०५’ या मालिकेत तो दिसला होता. संग्रामला खरी ओळख मिळाली ती पुढचं पाऊल या मालिकेतून. या मालिकेतील समीर या व्यक्तीरेखेमुळे तो घराघरात पोहोचला. त्याचबरोबर हे मन बावरे मालिकेलीत त्याची भूमिका विशेष गाजली. या मालिकेत तो निगेटीव्ह रोलमध्ये दिसला.

  त्यानंतर त्याने ‘एकच प्याला’ या नाटकात काम केले. या संगीत नाटकातील त्याची सुधाकरची भूमिका प्रेक्षकांना आवडली.