sanjay dutt

अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाला असून त्याचा कर्करोग तिसऱ्या स्टेजचा असल्याचे निदान झाले आहे.  (Sanjay Dutt Diagnosed With Lung Cancer). संजय दत्त काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे  लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता.त्यांनतर त्याला दोन दिवसांनी घरी सोडण्यात आले होते. दरम्यान संजय दत्तला आता उपचारांसाठी नियमित रुग्णालयात जावे लागणार आहे. आज तो  मुंबईतील त्याच्या निवासस्थानाहून कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला आहे. 

 

संजय दत्तबरोबर रुग्णालयात जाताना त्याची पत्नी मान्यता दत्त, बहिण प्रिया आणि नम्रता दत्तही त्याच्यासोबत होत्या.”माझ्यासाठी प्रार्थना करा”,  असे म्हणत त्याने निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहात्यांना, छायाचित्रकारांच्या दिशेने थम्सअपची खूण केली. सध्या त्याचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.