‘पवित्र रिश्ता-२’ : अंकिता लोखंडेसोबत ‘हा’ अभिनेता झळकणार मानवच्या भूमिकेत, नाव वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य!

लोक आतुरतेने वाट पाहत असलेली ‘पवित्र रिश्ता २’ मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या शोच्या सिक्वलमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेच अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे.

    छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेतील अर्चना आणि मानवच्या जोडीने चाहत्यांची मोठी पंसती मिळवली होती. या मालिकेमुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे घराघरात पोहचले. मालिकेला २ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता या मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मागच्या वर्षी अंकिताने आणि मालिकेची निर्माती एकता कपूरने या मालिकेची घोषणा केली.

    लोक आतुरतेने वाट पाहत असलेली ‘पवित्र रिश्ता २’ मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या शोच्या सिक्वलमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडेच अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे. “अभिनेता शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार असून ७ वर्षांनंतर अंकिता लोखंडे पुन्हा अर्चनाच्या भूमिकेत झळकणार आहे. तर मालिकेतील इतर भूमिकांसाठी लवकरच कास्ट ठरवण्यात येईल.” अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. जवळपास एक वर्षाने मालिकेच्या कथेवर आणि स्क्रिप्टवर काम पूर्ण झालेलं आहे. ही मालिका बालाजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.