sajid khan, sharlin chopra

शर्लिनने साजिदवर आरोप केले आहेत की, 'एप्रिल २००५  मध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी जेव्हा मी साजिदला भेटले. तेव्हा त्यानं त्याच्या पँटमधून प्रायवेट पार्ट काढून मला पकडण्यास सांगितला. तसेच त्याचा हात लावयला सांगितला. त्यावेळी मी त्याला सांगितलं की, मला माहित आहे की पुरुषाचं प्रायव्हेट पार्ट काय असतो. त्यामुळे तुझ्या या भेटीमागचा माझा उद्देश प्रायव्हेट पार्ट पकडणं नाहीये.' अशा आशयाचं ट्वीट करत शर्लिनने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

अभिनेत्री जिया खानची बहिण करिश्मा खानने बॉलीवूड दिग्दर्शक साजिद खानवर नुकताच लैंगिक शोषणाचा आरोप लावला. त्यानंतर साजिद खानवर चहूबाजूने टीका होऊ लागली. आता अभिनेत्री आणि मॉडेल शार्लिन चोप्रानेही साजिद खानविषयी खळबळजनक खुलासा केला आहे. शर्लिनने ट्विटरवरून साजिदवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शर्लिन चोप्राचे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहेत.

शर्लिनने साजिदवर आरोप केले आहेत की, ‘एप्रिल २००५  मध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी जेव्हा मी साजिदला भेटले. तेव्हा त्यानं त्याच्या पँटमधून प्रायवेट पार्ट काढून मला पकडण्यास सांगितला. तसेच त्याचा हात लावयला सांगितला. त्यावेळी मी त्याला सांगितलं की, मला माहित आहे की पुरुषाचं प्रायव्हेट पार्ट काय असतो. त्यामुळे तुझ्या या भेटीमागचा माझा उद्देश प्रायव्हेट पार्ट पकडणं नाहीये.’ अशा आशयाचं ट्वीट करत शर्लिनने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

शर्लिनच्या या ट्वीटनंतर ट्वीटरवर बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. काही युजर्सनी त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. तसेच अजून एका ट्विटर वापरकर्त्यानं म्हटलं की, ‘तुम्ही यापूर्वी कधीही अशाप्रकारचा आरोप केला नाही, तुम्ही तक्रार दाखल करायला पाहिजे होती. त्यानं तुमच्याशी गैरवर्तन केलं असताना तुम्ही इतके दिवस शांत का होता? त्याला उत्तर देतान शर्लिन म्हणाली की- ‘साजिदकडे असे अनेक सुपरस्टार्स आहेत, जे त्याच्या चारित्र्याबाबत पाठिंबा देवू शकतात. माझे हे शब्द त्यांच्या विरुद्ध आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये माफियांचा एक मोठा गट तयार केला आहे.